अंमली पदार्थ विक्री करणाऱा संशयित पोलिसांच्या जाळ्यात

81 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- शहरातील एकता मार्ग ते उद्यमनगर रस्त्यावर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 81 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहसीन अब्दुल गणी शेख (वय 36, रा. आरसी चर्च रोड, बाजारपेठ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. 3) रात्री साडेआठच्या सुमारास उद्यमनगर जाणाऱ्या रस्त्यावर संसारे गार्डनच्या पाठीमागे गेटजवळ निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित संसारे गार्डनच्या पाठीमागील गेटजवळ हेरॉईन हा अंमली पदार्थ स्वतः जवळ ठेवलेल्या स्थितीत सापडला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे 80 हजार रुपयांच्या 93 कागदी पुड्या त्यामध्ये खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉईन उग्रवासाचा अमंली सदृश्य पदार्थ सापडला. प्लास्टीक पाऊचसह वजन केले असता ते 6 ग्रॅम होतो व 1 हजार 700 रुपये रोख मिळाले. पोलिसांनी एकूण 81 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी एन. डी. पी. एस अॅक्ट अन्वये संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.