रत्नागिरी:- शहरातील हिंदू कॉलनी परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने ओळखीत राहणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. ही युवती पाली परिसरातील एका गावात राहणारी आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात नातेवाईकांच्या तक्रारीवरून आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेत मृत झालेली ती अल्पवयीन युवती हिंदू कॉलनी येथे शिक्षणाच्या निमित्ताने रहायला होती. रत्नागिरीत ती 11 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. त्यामुळे ती या वर्षी सद्या परिक्षा सुरू होती. शनिवारी येथील राहत्या घरी कुणीही नसताना तिने घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला होता. दुपारी विजय वासुदेव यादव हे आपल्या घरी आले असता, त्यांना ती युवती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली.
या प्रकारी खबर यादव यांनी शहर पोलिसांना दिली. त्या युवतीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान वैदकीय सूत्रांनी तिला दुपारी 2.30 वा. मृत घोषित केले. मात्र या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटना पंचनामा केला असता त्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येची नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे. तिने कोणत्या कारणातून आत्महत्त्या केली याचा अजूनही उलगडा झालेला नाही. याप्रकरणात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील या करत आहेत.









