वाढीव ७ कोटीमुळे काम गेले १७ कोटीवर ; फुटिंगच्या काम हाती
रत्नागिरी:- अखेर तीन ते चार वर्षे रखडलेले रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाले आहे. ठेकेदाराने मागितलेली वाढीव ७ कोटीची रक्कम शासनाने मंजूर केल्यानंतर आण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे ठप्प झालेल्या हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाले. ४० फुटिंगपैकी ३८ फुटिंग झाले आहे, उर्वरित २ फुटिंग कामाला सुरवात झाली आहे. एसटी महामडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. त्यामुळे १७ कोटीवर हे हायटेक बसस्थानक गेले आहे.
रत्नागिरी दौर्यावर असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हायटेक बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला भेट दिली. यावेळी एसटीचे अधिकारी, ठेकेदार आदी उपस्थित होते. काम रखडण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. ठेकेदाराने कोरोना काळातील बंदच्या
कालावधित वाढीव निधीची मागणी केली.
साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यामुले त्याने ७ कोटी वाढीव निधीची मागणी केली होती. मात्र ती मंजूर न झाल्यामुळे ठेकेदाराने काम बंद ठेवले होते. उदय सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून केला. त्यामुले सुमारे १० कोटीचे काम सतरा कोटींवर गेले आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पहिल्या दौर्यात याठिकाणी भेट दिली होती.
मंत्री सामंत यांनी वाढीव निधीची तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्न केले आणि ७ कोटी रुपये वाढीव निधी य़ा बसस्थानकासाठी शासनाने मंजूर केले. तत्कालीन पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे परिवहन खाते असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. सामंतांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि बंद असलेल्या हायटेक बसस्थानकाचे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ४० फुटिंग पैकी ३८ फुटिंगचे काम झाले होते.
उर्वरित २ फुटिंग सुरू केले आहे. ७ कोटी रुपये वाढीव निधी आणि यापूर्वीचे १० कोटी असे १७ कोटीवर बसस्थानकाचे काम गेले आहे.