हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २६० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चांदेराई ते कुरतडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला विनापरवाना हातभट्टीची २६० रुपयांची पाचलिटर दारु विक्री करत असताना सापडली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रोशन सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमलंदार करत आहेत.