रत्नागिरी:- रत्नागिरीतील हातखंबा येथे दोन ट्रकचा सोमवारी सकाळी 10 वाजता भीषण अपघात झाला. हातखंबा गावात उतारातून भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिली आणि या अपघातानंतर दोन्ही ट्रकनी पेट घेतला. दोन्ही ट्रक मधील चालकांना गावातील तरुणांनी जीवाची बाजी लावत वाचवले.

साखरेची वाहतूक करणारे दोन्ही ट्रक असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे. हातखंबा गावात उतारून येणाऱ्या ट्रक ने आधी दुचाकीला धडक दिली आणि नंतर पुढील ट्रक ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या टायर ने पेट घेतला आणि दोन्ही ट्रक एकाचवेळी पेटले. गावातील मुन्ना देसाई मित्र मंडळाच्या तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अग्निशमन यंत्रणा तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी माजी नगरसेवक निमेष नायर यांच्याशी संपर्क करण्यात आला तर आगीवर नियंत्रण मिळावे यासाठी स्थानिक विहिरीतून पानी पुरवठा घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. दोन्ही ट्रक मधील चालकांना वाचवण्यात यश आले असले तरी आगीत ट्रक आणि आतील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.









