हातखंबा पीर येथे डंपर पलटी होऊन अपघात; सलग दुसऱ्या दिवशी अपघात

रत्नागिरी:- हातखंबा येथे महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. हातखंबा पीर येथे उतारात डंपर उलटून अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डंपर असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हातखंबा पीर येथील तीव्र उतारावर हा अपघात होऊन डंपर पलटी झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.