रत्नागिरी:- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ठोकर देवून पलायन करणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास हातखंबा ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावरील भोके-आंबेकरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पादचारी प्रकाश रघुनाथ पांचाळ (वय ७०, रा. नांदिवली, पो. शिरबवंली ता. लांजा) हे रात्री हातखंबा ते निवळी असा मुंबई ते गोवा जाणाऱ्या महामार्गावरुन भोके-आंबेकरवाडी जाणाऱ्या तिठ्यासमोर रस्त्याच्या दुभाजक चे पलीकडून निवळी ते हातखंबा जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी ओमकीत सखाराम तारवे (वय ३३, रा. हातखंबा तारवेवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









