वंचित आघाडी, बसपासह रिपब्लिकन पार्टीचा अल्टिमेटम
रत्नागिरी:- साडवली (ता. संगमेश्वर) येथील अनिकेत जाधव या बौद्ध समाजाच्या युवकाला काही तरूणांनी जातीवाचक शिवागाळ करत डोक्यात चिरा घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर त्याच्या गुप्तांगालाही गंभीर दुखापत केली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात आम्ही सर्व समाज एकत्र आल्यानंतर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परतु अद्याप गुन्हेगार मोकाट आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये या गुन्हेगारांना अटक केली नाही, तर आम्ही सर्व समाज एकत्र येऊन पोलिस दलाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू, असा अल्टिमेटम रिपब्लिकन पार्टीचे कोकण संघटक रोहित तांबे यांनी दिला.
शासकीय विश्रमगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याळी वंचित आघाडी, बसपा, रिपाई आदींचे पदाधिकारी अशोक पावर, कृष्णा कदम, चंदन कदम, श्री. कांबळे, संतोष जाधव, राजेंद्र मोहते, मंगला तांबे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, साडवली येथील तरूण अनिकेत जावव या बौध्द समाजातील युवकास ४ एप्रिल २०२३ ला एका टोळक्याकडुन जातिवाचक शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. यावेळी डोक्यात चिरा आपटून जाधव याला ठार करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याने चिरा चुकवला. परंतु त्याला खाली पाडुन मारहण करण्यात आली. यात त्याच्या गुप्तांगालाही गंभीर दुखापत झाली. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात केल्यास तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकीही चार संशयितानी दिली. युवकाने त्यावेळी पोलिसांकडे तक्रार सुध्दा न दिल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून गुन्हेगारांची मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचे दिसून येते. गुन्हेगार सराईत असावेत असा आमचा कयास आहे. त्यातील काही आरोपींच्याबाबत वारंवार पोलिसांमध्ये तक्रारी दाखल आहेत. यापूर्वी देखील यांनी साडवली गावांमधील बॅनर जयंतीच्या दिवशी फाडून टाकल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार पुन्हा घडू नये किंवा यापेक्षा आणखी काहीतरी वेगळा प्रकार घडवून समाजामधील शांतता भंग होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असावे, असे आम्हाला वाटते.
दबाव टाकल्यानंतर आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणी ३०७ व अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ एप्रिल २०२३ ला संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या विषय हा जातीत द्वेषासंबंधीचा असल्याने तालुक्यात किंवा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये, तसेच या जातिवाचक विचार सरणीच्या आरोपींना येत्या दोन दिवसात अटक करावी, अन्यथा समाजाच्या संरक्षणार्थ सर्व स्तरावर वंचित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वरच्या कार्यकत्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील, असे श्री. तांबे यांनी यावेळी इशारा दिला.









