स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ८४६ ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण

रत्नागिरी:- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात केंद्र शासन पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुका प्रकल्पांची (प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन) पाहणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीमध्ये ही तपासणी सुरु झाली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत विविध घटकांसाठी १००० गुण निश्चित करण्यात आले आहेत. गुणांकनाचे निकष (१०० गुण) गावातील घरांपैकी नोंदवलेल्या एस.डब्ल्यू.एम. मालमत्तांनी व्यापलेल्या घरांचा प्रमाण (२०) गावातील घरांपैकी नोंदवलेल्या एल.डब्ल्यू.एम. मालमत्तांनी व्यापलेल्या घरांचा प्रमाण (२०) ओ.डी.एफ. प्लस मॉडेल गाव प्रमाणपत्रासाठी सर्व निकष पूर्ण करणारी गावे (२०) योग्य ग्रामसभा ठराव व्हिडिओ अपलोड केलेली गावे (२०) स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या पोर्टलवरील स्वयंमुल्याकंन अहवाल.

गुणांकनाचे निकष (१४० गुण) यामध्ये जिल्हा पातळीवर आवश्यक मानवी संसाधनांची उपलब्धता (२०) ब्लॉक पातळीवर आवश्यक मानवी संसाधनांची उपलब्धता (२०) ज्या गावांनी व्ही.डब्लू.एस.सी. स्थापन केलेली आहेत (२०) प्रशिक्षित स्वच्छाग्रहिणी पोस्ट केलेल्या गावे (२०) डी.टी.एम.यू. द्वारा १ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२५ दरम्यान आयोजित प्रशिक्षणांची संख्या (३०) डी.टी.एम.यू. कडून १ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२५ दरम्यान प्रशिक्षित व्यक्तींची संख्या (३०) असे गुणांकन असणार आहे. प्रत्यक्षात क्षेत्रीयस्तरावर निरिक्षणे नोंदवली जाणार आहेत. कुटुंबस्तर सर्वेक्षण, गाव स्तरावरील (शाळा, अंगणवाडी, पंचायतघर, बाजाराची ठिकाणे, सार्वजनिक शौचालय, आरोग्य सुविधा, तीर्थक्षत्रे) स्वच्छतेच्या व्यवस्था यांची पडताळणी केली जाणार आहे. यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या मार्गदर्शक सुचनेनुसार कामे झाली आहेत अथवा कसे याबाबत निरिक्षणे नोंदवली जाणार आहेत. हे ५४० गुणांचे असणार आहे.