रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे मासेमारी करण्यासाठी खाडीत गेलेल्या प्रौढाला चक्कर आल्याने तो पाण्यात पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. विकास शांताराम बारगोडे (वय ४३, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी अडीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास बारगोडे हे आज दुपारी मासे पकडण्यासाठी खाडीत जाळे लावले होते. ते काढण्यासाठी पुन्हा गेले असताना अचानक त्यांना चक्कर आल्याने ते पाण्यात बुडाले. ग्रामस्थांना या बाबत माहिती मिळताच त्याला पाण्यातून काढून तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.