रत्नागिरी:- रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील सिंचन भवन समोर दुचाकीची रिक्षाला धडक बसून अपघात झाला. अपघाताची ही घटना शनिवार 31 मार्च रोजी दुपारी 1 वा.घडली असून जखमी झालेल्या रिक्षा चालक आणि दुचाकी चालकाला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संदेश मारुती चव्हाण (62, रा.जुवे,रत्नागिरी) आणि मोरे नामक दुचाकी चालक अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. शनिवारी दुपारी संदेश चव्हाण आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच- 08-के- 3759) मधून महिला प्रवाशांना डि-मार्ट येथे सोडून पुन्हा मारुती मंदिरच्या दिशेने वळून येत होते. त्याच सुमारास कुवारबाव ते मारु मंदिर येत असणारी दुचाकी (एमएच -46-एएम- 8805) ची चव्हाण यांच्या रिक्षेला मागील डाव्या बाजुस धडक बसल्यामुळे रिक्षा पलटी होउन हा अपघात झाला होता. तेथील नागरिकांनी दोघांनाही तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. या अपघाताची नोंद जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित करण्यात आली आहे.









