Friday, July 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी साळवीस्टॉप येथे गुरांना अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

साळवीस्टॉप येथे गुरांना अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

तक्रारदारालाही दिली धमकी

रत्‍नागिरी:- घरासमोर आलेल्या गुरांना वेदना व याताना होतील अशा रितीने दगड व काठीने मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावणी श्रीराम केळकर (रा. स्वरुप विश्व छाया साळवीस्टॉप नाचणे,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ८) सायंकाळच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यशोदीप चंद्रकांत कयाळ (वय ४३, रा. औदुंबर छाया साळवीस्टॉप, रत्‍नागिरी ) हे संशयित महिलेच्या शेजारीच राहणारे आहेत. संशयित महिलेने २०२४ पासून ८ जुलै या कालावधीत मोकाट गुरे ही फिर्यादीच्या घरासमोर आली असता त्‍यांना दगड व काठीने अमानूषपणे मारहाण केलेली आहे. त्‍यामुळे फिर्यादी यशोदीप कयाळ यांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे तसेच संशयित महिलेले फिर्यादी व साक्षिदार यांना शिवीगाळ करत मी तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देते. या प्रकरणी फिर्यादी यशोदीप कयाळ यांनी शहर पोलिस तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
Make heading