रत्नागिरी:- साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोडवरील प्रवीण मलुष्टे यांच्या बंगल्याशेजारील वर्षानुवर्षे पाणी गळतीचा प्रश्न सोडवण्यात सौरभ मलुष्टे आणि दिपक पवार यांना यश आले आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी आणि रनपच्या अधिकाऱ्यांनी एकत्र आणत येथील पाणी गळतीचा प्रश्न निकाली काढत दररोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवले आहे.
साळवी स्टॉप भागातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचा धडाकाच सौरभ मलुष्टे आणि दिपक पवार यांनी सुरू केला आहे. येथील प्रवीण मलुष्टे यांच्या बंगल्याशेजारी पाणी गळतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून होता. याकडे सौरभ मलुष्टे आणि दिपक पवार यांनी लक्ष टाकले. उद्योजक किरण सामंत यांच्याकडे या प्रश्नावर चर्चा केली. नेमकी गळती रनपच्या पाइपलाइनला की एमआयडीसीच्या पाइपलाइन हे अनेक वर्षे निश्चित होत नव्हते. अखेर पालकमंत्री उदय सामंत अनाई उद्योजक किरण सामंत यांनी रनपचे सीईओ बाबर आणि एमआयडीसीचे बी. एन. पाटील यांच्यासह या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचा समन्वय साधत बुधवारी हा प्रश्न निकाली काढण्यात यश आले. यामुळे अनेकवर्षे सुरू असलेली पानी गळती रोखण्यात यश आले आहे.