रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील महिलेने अज्ञात कारणातून आंबा फवारणी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी तिला. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
राखी अनिल पवार ( ४३, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे फवारणीचे औषध प्राशन केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवार ५ मे रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली. राखी पवार हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या बाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे









