सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग; तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करुन शांततेचा भंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन लहु खाके (वय ३१, रा. चिंचवाडी, हरचेरी, जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन याने मद्य प्राशन जिल्हा रुग्णालयात शिवीगाळ व आरडा ओरडा करुन शांततेचा भंग केला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.