रत्नागिरी:- शहरातील परटवणे, मिरजोळे विमानतळ, चंपक मैदान येथील रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपात तसेच तालुक्यातील जयगड येथील गणेशवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार संशयितांविरुद्ध शहर-ग्रामीम व जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ताराम तुकाराम सावंत (वय ४५, रा. झाडगावनाका, रत्नागिरी), देवेंद्र संतोष भेरे (वय २६, रा. मार्लेश्वर बोडये भेरेवाडी ता. संगमेश्वर, रत्नागिरी) व प्रकाश आत्मराम माने (वय ६१, रा. कासारी, गव्हाणवाडी-रत्नागिरी), अक्षय रमेश रसाळ (वय ३०, रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. संशयित रस्त्याच्या कडेला झाडीझुडपात मद्यपान करत असताना आढळून आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर व महिला पोलिस कॉन्स्टेबल अमिता पाटील आणि पोलिस शिपाई प्रितेश लोटणकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर जाधव यांनी शहर-ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.









