रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात तब्बल 27 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात साईनगर परिसरात चार कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा आलेख चढाच आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात 27 रुग्ण सापडले आहेत. यानुसार साईनगर येथे 4 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय मालगुंड मध्ये देखील 3 रुग्ण सापडले आहेत. कुवारबाव परिसरात रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार या भागात 2 नवे रुग्ण सापडले आहेत. झाडगाव भागात देखील 2, मिरजोळे 2, शिरगाव 1, जे के फाईल 1, चर्मालय 1, जयस्तंभ 1, परटवणे 1, मुरुगवाडा 1, टिळक आळी 1, नाचणे रोड 1, आठवडा बाजार 1, वरची आळी 1, मांडवी 1, आंबेत खेड 1, कलंबसते चिपळूण 1 आणि भरणे खेड येथे एक रुग्ण सापडला आहे.









