रत्नागिरी:-कोरोनामुळे बंद ठेवलेली वातानुकूलित डबल डेकर एक्स्प्रेस सव्वा वर्षांनंतर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. गोव्यात येणार्या प्रवाशांसह पर्यटकांमधून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत होता.
देशात कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गेल्या वर्षी गेल्या वर्षी 20 मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्यांतर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी डबल डेकर एक्स्प्रेस यार्डातच विसावली होती. आता हळुळहू कोकण रेल्वेच्या गाड्या पूर्ववत होऊ लागल्या असतानाच दिवसा तसेच रात्रीची धावणारी अशा डबल डेकरच्या दोन्ही सेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. दिवसा धावणारी डबल डेकर एक्स्प्रेस 2 ऑगस्टपासून आवड्यातून धावणारी डबल डेकर (01085/01086) सोमवारी व बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून पहाटे 5.33 वाजात सुटेल, तर मडगावहून ही गाडी 3 ऑगस्टपासून दर मंगळवारी आणि बुधवारी पहाटे 5 वाजात मुंबईसाठी सुटणार आहे. रात्रीच्या वेळी मुंबईहून सुटणारी साप्ताहिक डबल एक्स्प्रेस (01099/01100) ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनहून 7 ऑगस्टपासून दर शनिवारी रात्री 12 वाजात 45 मिनिटांनी सुटणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून 8 ऑगस्टपासून दुपारी 12.15 वाजता सुटणार आहे. ही डबल डेकर एक्स्प्रेस त्याच दिवशी रात्री 11 वाजात 45 मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या दोन्ही डबल डेकर गाड्या या 12 एलएचबी वातानुकूलित कोचसह धावणार आहेत. डबल डेकर गाडी ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थीवीम स्थानकांवर थांबणार आहे. नाईट डबल डेकर ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थीवीसह करमाळी स्थानकावरही थांबणार आहेत. गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली डेकर एक्स्प्रेस पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावणार असल्याने कोरोना महामारीत प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येऊ लागल्याने कोकणवासीय प्रवासी जनतेला दिलासा मिळाला आहे.









