संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी संगमेश्वर येथे दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सकाळच्या वेळेत शास्त्रीपुल ग्रामीण रुग्णालयाजवळ दुचाकी आणि मोठ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चिपळूण तालुक्यातील पिपंली येथील विलास महादेव चव्हाण (वय 43) यांचा दुचाकीवरील प्रवास अत्यंत गंभीर अपघातात बदलला. अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या चक्क्याखाली येऊन त्यांचा पाय गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टर मोरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा सल्ला दिला.
याच दिवशी, संगमेश्वर पोलीस ठाण्यापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर पुनर्वसन येथे एक दुसरी अपघाताची घटना घडली. यात MH05FV2736 सकार्पिओ आणि MH11AL0832 आयषर ट्रकचा अपघात झाला. या अपघातात सकार्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर आयषर गाडीवर किरकोळ नुकसान झाले. या अपघातात सकार्पिओ चालक भीमराव मरिअपा चालवादी आणि आयषर ट्रक चालक मयूर हनुमंत चंदनशिवे होते.
या दोन्ही घटनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, मात्र संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी पोहोचून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी सांगितले की, सकार्पिओ आणि आयषर अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर दुचाकी आणि चारचाकीची नोंद करण्यात आली आहे.









