संक्रांतीच्या दिवशी दापोली शहरालगतच्या तीन वृद्ध महिलांचा एकाचवेळी जळून मृत्यू

दापोली:- दापोली शहरालगत संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. दापोली शहरापासून काही किलोमीटर वणोशी खोतवाडी इथे तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी जळून मृत्यू झाला असून या घटनेने दापोलीत एकच खळबळ उडाली आहे. 

या हृदयद्रावक घटनेमध्ये सत्यवती पाटणे (75), पार्वती पाटणे (90) व इंदुबाई पाटणे (85) या तीन महिलांचा जळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी सखोल चौकशीला सुरूवात केली आहे. या तीनही महिलांचा एकमेकींना आधार होता. अचानक अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं या प्रकरणामध्ये संशयाचा वास येऊ लागला आहे. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.