शेलडी मध्ये वाहून गेलेल्या त्या तरुणाचा मृतदेह सापडला

खेड:- खेड तालुक्यातील शेलडी येथील धरणाच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी अथक प्रयत्ना नंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धरणाच्या खालच्या बाजुला पाणी कमी झाल्याने झुडूपामध्ये आढळून आला

जयेश रामचंद्र आंब्रे असे त्या मृतदेह आढळून आलेल्या चे नाव आहे रविवारी मुसळधार पावसात शे लडी धरणा च्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता त्याचा रविवारी शोध घेण्यात आला मात्र मृतदेह आढळून आला नव्हता सोमवारी पुन्हा शोध कार्य हाती घेत घेण्यात आलेल्या शोधात त्याचा मृतदेह आढळून आला