शेकोटी घेताना महिला ६० टक्के भाजली

रत्नागिरी:- परिसरातील पाला-पाचोळा गोळा करुन शेकोटी घेताना ओढणी व गाऊन पेट घेतल्यामुळे महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारसाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. मुमताज मुनवर पाटणकर (वय ५२, रा. आंबवली देवरुख ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी आठच्या सुमारास आंबवली-देवरुख येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुमताज सकाळी घराच्या परिसरातील पाला-पाचोळा गोळा करुन तो पेटवून शेकोटी घेत होती. अचानक तिच्या ओढणीने व गाऊनने पेट घेतला. त्यामध्ये ती ६० टक्के भाजली. तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.