Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेचा मृत्यू

शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सेजल संतोष गुरव (वय ४२, रा. चांदेराई बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ५) मसिना हॉस्पिटल-मुंबई येथे घडली.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार २२ डिसेंबर २०२५ ला सकाळी सेजल चुलीजवळ शेकोटी पेटवून शेकत बसलेली असताना अचानक तिच्या गाऊनने पेट घेतला. त्यामध्ये ती ४५ टक्के भाजली. तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मसिना हॉस्पिटल-मुंबई येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.