पार्थ आग्रे जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तब्बल २० विद्यार्थी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकवले आहेत. विशेष म्हणजे पार्थ आग्रे हा विद्यार्थी २७० गुणांसह ७वी शिष्यवृती शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डाएट रत्नागिरीचे प्राचार्य सुशील शिवलकर, तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे, मुख्याध्यापक भगवान मोटे यांच्या उपस्थितीत दामले विद्यालयात अभिनंदन करण्यात आले.
शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी याप्रमाणे: (इ.४थी शिष्यवृत्ती) युवराज ओलेकर जिल्ह्यात २ रा (२७०), श्रीवल्लभ कुलकर्णी जिल्ह्यात १० वा (२५२), माहिरा सय्यद जिल्ह्यात २२ वी (२४०), आराध्या कोकरे जिल्ह्यात ४७ वी (२२६), ईरा भावे जिल्ह्यात ६२ वी (२१८), श्वेत पांचाळ जिल्ह्यात ७२ वा (२१६), स्वानंदी धुळप जिल्ह्यात ७५ वी, (२१४), अर्णव करडे जिल्ह्यात ९१ वा (२०८), भूमी भवतले जिल्ह्यात ९६ वी (२०४), प्रेम कोकरे जिल्ह्यात १०० वा (२०२), श्रीशा कोतवडेकर जिल्ह्यात ११० वी (गुण २०२). इयत्ता ४थी शिष्यवृत्तीसाठी सौ. गौरी रजपूत, सौ. सारिका गोरे, श्री. प्रफुल्ल मयेकर श्री. प्रवीण पाचलकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
इ ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक: पार्थ आग्रे जिल्ह्यात १ ला (२७०), आर्या शिंदे जिल्ह्यात ४ थी (२६४), आभा लोगडे जिल्ह्यात ६वी (२६२), आदित्य वाघचवरे जिल्ह्यात ९वा (२५४), अक्षाली सांबरे जिल्ह्यात ३०वी (२२६) अद्वैता देसाई जिल्ह्यात ५१ वी (२१६), स्वरा सुवरे जिल्ह्यात ५२ वी (२१४), आराध्या कामतेकर जिल्ह्यात ७६ वी (२०६),उत्कर्षा माळी जिल्ह्यात ८१ वी (२०४). या विद्यार्थ्यांना सौ. जुलेखा काझी, सौ. उज्ज्वला साळुंखे, सौ. सिद्धी विचारे, सौ. श्रद्धा गांगण, श्री. योगेश कदम, श्री. अक्षय जोगळेकर, श्रीम. ज्योती डंबाळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, श्री. समीर तिवरेकर(उपनगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती रत्नागिरी नगरपरिषद),डाएट प्राचार्य श्री. सुशील शिवलकर, प्रशासन अधिकारी प्रा. श्री. सुधाकर मुरकुटे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे, मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.









