शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या इसमाला शिवसैनिकांकडून चोप

रत्नागिरी:- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका इसमाला रत्नागिरीतील शिवसैनिकांनी चांगलाच प्रसाद दिल्याची माहिती मिळत आहे. 

हा इसम मागील अनेक दिवसांपासून अशा पोस्ट टाकत होता असे सिवासैनिकांचे म्हणणे आहे. या इसमाला शिवसेना शहर कार्यालय येथे नेवून हा प्रसाद दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, उप जिल्हाप्रमुख संजू साळवी, उपशहर प्रमुख बावा चव्हाण, प्रशांत साळुंखे, संजय शिंदे, प्रकाश गुरव, राहुल रासालाडी शिवसैनिक उपस्थित होते. आता या इसमाला पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे.