रत्नागिरी:- कै. राजेश शरदचंद्रस्वामी शेट्ये यांच्या स्मरणार्थ नाका बॉईज आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी परिसरात क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी उपतालुका प्रमुख विशाल उर्फ भैय्याशेठ शिंदे, विभाग प्रमुख परेशजी सावंत साहेब, दिपकजी मोरे, परेशशेठ कुमठेकर, उपविभाग प्रमुख स्वप्नील उर्फ पप्पू शिवलकर, भूपेश उर्फ बंधूशेठ भाटकर, उपसरपंच मिलिंददादा बाणे उपस्थित होते.
तसेच नाका बॉईज मंडळाचे मार्गदर्शक पवनदादा शेट्ये, त्रिभुवनंद शेट्ये, वैभव शेट्ये, सिद्धी शेट्ये यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते शुभम शेट्ये, आदित्य शेट्ये, भाई शेट्ये, अजित घडशी, आशिष शेट्ये, श्रेयश शिंदे, मयूर शेट्ये, प्रसन्न पवार, निखिल शिंदे, भाग्येश मयेकर तसेच इतर कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमुळे युवकांना खेळासाठी व्यासपीठ मिळत असून ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळत आहे. पुढील काही दिवस ही स्पर्धा रंगणार असून क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.









