रत्नागिरी:- प्रथम जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या कराव्यात, असे एका दिवसात आदेश काढले. यामुळे आता शिक्षकांच्या सोईसाठी नवीन भरती रखडली आहे. बुधवारी जिल्हांतर्गत बदल्यांना प्रारंभ झाला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती अगदी अंतिम टप्प्यात आली होती. फक्त नियुक्ती आदेश देण्याचे काम बाकी होते. मात्र तेवढ्यातच शिक्षक संघटनांनी एकत्र येत प्रथम आमच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी केली. शासनाला सुद्धा संघटनेपुढे नमते धोरण घेवून प्रथम बदल्या कराव्यात, असे एका दिवसात आदेश काढले. यामुळे आता शिक्षकांच्या सोईसाठी नवीन भरती रखडली आहे. बुधवारी जिल्हंतर्गत बदल्यांना प्रारंभ झाला आहे.
यामुळे आता जिल्हांतर्गत बदलीचा प्रश्न सोडविल्यानंतरच नवीन उमेदवारांसाठी समुपदेशन घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार बुधवारी शिक्षकांचे समुपदेश लावण्यात आले. या समुपदेशनाला जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त शिक्षक हजर होते. सध्या फक्त या शिक्षकांना तालुकाच देण्यात आला आहे. दोन दिवसांत शाळा देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. या समुपदेशाला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.









