शिक्षक पतपेढीसाठी विक्रमी 99.50 टक्के मतदान; आज निकाल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या 16 जागांसाठी शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान झाले. सकाळपासूनच या मतदानासाठी शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्त पतिसाद दिला. दिवसभरात या पकियेत एकूण मतदार 5256 पैकी झालेले मतदान 5030 टक्केवारी 99.50 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. आज 5 नोव्हेंबर रोजी या निवडणूकीची मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

पतपेढीची सन 2023 -2028 या पाच वर्षांची स्थगित झालेली निवडणूक जाहीर करण्यात आली. विद्यमान संचालक मंडळ 10 मे 2017 रोजी अस्तित्वात आले होते. करोना महामारीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्याने सत्ताधारी संचालक मंडळाला 22 मे पासून आपोआप मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर गेल्या 5 जून रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार 16 जागांसाठी तब्बल 100 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ते सर्व वैध ठरले होते. मात्र 23 जुलै रोजी होणारी निवडणूक सहकार खात्याच्या 28 जूनच्या आदेशानुसार 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित झाली होती. ती निवडणूकीचे मतदान 4 नोव्हेंबर रोजी घेण्यात आले.
त्यासाठी झालेल्या मतदानात सत्ताधारी महायुती पॅनेल आणि महापरिवर्तन सहकार आघाडी यामध्ये रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक मंडळाच्या 16 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती पॅनेलमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख सभा, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य उर्दू संघटना यांचा समावेश आहे. महायुतीचा प्रचार अधिक जोमाने करण्यात आला होता. डमी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सरळ लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीतर्फे जिल्हा राखीव, तालुका मतदारसंघातून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तर महापरिवर्तन सहकार आघाडीचे एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. तर काही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावेळी सत्ताधारी महायुती पॅनेल आणि महापरिवर्तन सहकार आघाडी यामध्ये रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी शिक्षक पतपेढीसाठी तालुका निहाय झालेले मतदान पुढीलपमाणेः लांजा 447 पैकी 425 मतदान, रत्नागिरी 830 पैकी 805 मतदान, देवरुख 728 पैकी 685 मतदान, दापोली 541 पैकी 522 मतदान, खेड 683 पैका 650 मतदान, चिपळूण 845 पैकी 826 मतदान, मंडणगड 285 पैकी 274 मतदान, गुहागर 374 पैका 343 मतदान, तर राजापूर राजापूर 523 पैका 501 मतदान झालेले आहे. एकूण मतदार 5256 पैकी 5030 मतदारांनी उमेदवारांना कौल दिलेला असून टक्केवारी 99.50 टक्के मतदान झालेले आहे.