साखरपा:- चाफवली- देवळे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने प्राथमिक शिक्षक गजानन मोघे यांचे निधन झाले.
सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांचे ते निष्ठावंत प्रचारक होते. मितभाषी स्वभाव, अध्यापनातील सर्वश्रेष्ठ गुणवत्ता, अभिनय कलेतील बादशहा आणि मुख्याध्यापक म्हणून दूरदृष्टी ही त्यांची खरी ओळख होती. नासा-इस्रोमध्ये सलग तीन वर्षे विद्यार्थ्यांची निवड होण्यामागे त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मोलाचे होते. गटशिक्षणाधिकारी विजय परीट, विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, तानाजी नाईक, प्रदीप पाटील, सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ञ, समन्वयक समीर काब्दुले आणि अनेक प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ यांनी दुःख व्यक्त केले आहे.









