परकार हॉस्पिटल, मराठी पत्रकार परिषदेचे आयोजन
रत्नागिरी:- परकार हॉस्पिटल, रत्नागिरी आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी पालिकेच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व पथनाट्याचे आयोजन केले आहे. २४ सप्टेंबरला पालिकेच्या सर्व शाळांमध्ये या चित्रकला स्पर्धा होणार
आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आरोग्य सुरक्षा योजना या सुरक्षा योजनांची ४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून परकार हॉस्पिटल रत्नागिरी आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर २०२२ ला पालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला गटनिहाय स्पर्धा शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी आवश्यक ते साहित्य संस्थेकडून पुरवण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत ही स्पर्धा त्या-त्या शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे/प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे २७ सप्टेंबरला सायं. ४ वा. आरोग्यविषयीचे जनजागृती करण्यासाठी दामले विद्यालयात पथनाट्य घेण्यात येणार आहे.
चित्रकला रंग भरणे स्पर्धा सकाळी ९ ते ११ ला होणार आहे. यामध्ये पहिली आणि दुसरी अ गट, तिसरी व चौथी ब गट, पाचवी ते सातवी क गट आणि आठवी असे गट असणार आहेत. अ, ब गटाला चित्ररंगवणे स्पर्धा असणार आहे, तर क आणि ड गटासाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यासाठी स्व्छ भारत अभियान, अस्वच्छतेचा समुद्रातील जीवांवर काय परिणाम होऊ शकतो, सामाजिक माध्यमातून साफ-सफाई, जनजागृती करणारी मुले (रॅली) हे विषय असणार आहेत.
२६ तारखेला आई मी काय खाऊ… या विषयावर पाकलका स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिर्के हायस्कूलमधील रंजन मंदिरमध्य सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान ही स्पर्धा होईल. २९ सप्टेंबरला हृदयस्पंदन हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, सत्कार समारंभ आणि बक्षीस समारंभ होणार आहे. या दरम्यान होणाऱ्या चर्चा सत्रामध्ये डॉ. मतीन परकार आणि डॉ. केतन कोदारे हे सहभागी होणार आहेत. राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये (गोगटे कॉलेज) सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान हा कार्यक्रम होईल. अधिक माहितीसाठी डॉ. अनुराधा लेले(9075010661) आणि जान्हवी पाटील(8087943530) यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.









