रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहिम गतीमान झालेली आहे. चंपक मैदानालगच्या निवारा कंपाउंडमध्ये या मोहिमेत आतापर्यंत 70 गुरांना डांबण्यात आले असून त्याठिकाणी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनस्तरावरून गुरूवारपासून मोहिम गतीमान करण्यात आली आहे. या निवारा कंपाउंडमध्ये 70 गुरांची रवानगी नगर परिषदेमार्फत करण्यात आली आहे. शहरानजीकच्या चंपक मैदानशेजारी प्रशासनस्तरावरून हाती घेतल्या जाणाऱया मोकाट गुरांच्या धरपकड मोहिमेसाटी 15 जणांची टिम कार्यरत ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांच्या चार्याची आणि पाण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली. या गुरांच्या मालकांना 2 हजार रु. दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पण आतापर्यंत एकही गुरांचा मालक आपली गुरे नेण्यासाठी फिरकलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.