रत्नागिरी:- पुण्यामध्ये शिवसैनिकांनी आमदार उदय सामंत यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत असून त्या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई झाली पाहीजे. सामंत यांच्याबाबत असा विचार कोणी करत असेल त्यांना ईट का जवाब पत्थर से देऊ, असा इशारा तुषार साळवी यांनी दिला आहे.
रत्नागिरीतील युवा नेतृत्त्व श्री. साळवी हे उदय सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीतील शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत आम्ही सामंतांबरोबर असल्याचे ठणकाणारे म्हणून साळवी यांची ओळख आहे. पुण्यातील प्रकारानंतर श्री. साळवी यांनी तरुण समर्थक कार्यकर्त्यांसह बुधवारी (ता. 3) सकाळी आमदार सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात धाव घेतली. हल्ला करणार्यांविरोधात कार्यालयाबाहेर समर्थकांनी जाहीर निषेध नोंदवीला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. साळवी म्हणाले, आमदार सामंत हे रत्नागिरीचाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. शांत, सयंमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अशा व्यक्तीच्या विरोधात असला भ्याड पणा कोणी करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. राजकारणामध्ये कार्यरत सामंत यांनी आतापर्यंत वैचारीक पातळी कधीच सोडलेली नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीविरोधात जाणूनबुजून कोणी षडयंत्र रचत असतील तर ते कदापी सहन करणार नाही. हल्लेखोरांनी लक्षात ठेवले पाहीजे की तुमच्या घरात शिरुन फटके देण्याची आमच्यामध्येही धमक आहे.
पोलीस प्रशासनाला विनंत करताना ते म्हणाले, सामंत यांच्यावर हल्ला करणार्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहीजे. जेणेकरुन भविष्यात असली भ्याड कृत्य त्यांच्या हातून होणार नाहीत.