वीज खांबावरून पडून संगमेश्वमधील वायरमनचा मृत्यू

राजापूर:-राजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील विज खांबावर मेंटेनन्सची कामे करण्यासाठी चढलेल्या वायरमनचा वीज खांबावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 6 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुरेश रावजी भरणकर ( 58) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. ते संगमेश्वर कोळंबे येथील रहिवासी आहेत.

भरणकर हे आपल्या सहकाऱ्यासह चव्हाणवाडी येथे मेंटेनेंसचे काम करीत असता विज खांबावरुन खाली पडले, मात्र त्यांच्या सहकाऱ्यानी त्याना खाली पडताना झेलले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापुर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासाअंती मृत घोषित केले. 

  विज प्रवाह तर बंद करण्यात आला होता मग वीज खांबावरून कसे पडले असा प्रश्न नागरिकांना पडला होता. हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.