रत्नागिरी:- सालपे (ता. लांजा) येथील वृद्धाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. महेश विठ्ठल घाग (वय ६५, रा. सालपे, ता. लांजा, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी साडेसहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश घाग यांनी शनिवारी (ता. २) मद्याच्या नशेत गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटून लागल्यानंतर त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी-लांजा येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांना तपासून मृत घोषित केले. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









