विमानतळ परिसरात बांधकाम करताना पडून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळ परिसरात बांधकाम करत असताना पडून जखमी झाल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. मंगेश लक्ष्मण ठीक (45, रा करबुडे रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश ठिक हा रत्नागिरी विमानतळ परिसरात बांधकामाचे काम करत होता. 11 जून 2023 रोजी सकाळी 8 च्या सुमारास मंगेश हा सिमेंटची पोती नेत असताना अचानक त्याला चक्कर आली. यावेळी मंगेश 7 फुटावरून खाली पडून बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी 2.30 च्या सुमारास मंगेश याचा मृत्यू झाला.