वाकवलीमध्ये विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील वाकवली (गवळवाडी) येथे विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. नीता विनायक खेडेकर (३९, रा. सुशेरी, ता. खेड) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मागील १२ वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून तिच्यावर उपचार सुरू होते. २४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या परत न आल्याने खेड पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान, २५ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास वाकवली येथील सुनील लक्ष्मण बिर्रवटकर यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये त्या मृतावस्थेत आढळून आल्या. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत -आहेत.