वहाळ घडशीवाडी येथील युवकाची आत्महत्या

चिपळूण:- तालुक्यातील वहाळ घडशी वाडी येथे 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी एका 25 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ संदीप भागडे (वय 25) असे मृत युवकाचे नाव आहे.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ भागडे हा त्याच्या घराबाहेरील अंगणात असलेल्या शेडच्या लोखंडी चॅनलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सकाळी सात वाजता आढळून आला. त्याचे चुलते संजय शिवराम भागडे यांनी तात्काळ या घटनेची माहिती सावर्डे पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सौरभने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे भागडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.