रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी तालुक्यातील वळके पाली येथे अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सी.पी.आर रुग्णालयात मृत्यू झाला.
श्रावणी श्रीकांत गोरे (32,रा.वळके पाली, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी राहत्या घरी अज्ञात कारणातून तिने इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. काहीवेेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेले होते. तेथील सी.पी.आर रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवार 17 जुलै रोजी श्रावणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवार 22 जुलै रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









