लोककलावंतांना मदत करण्याचा उपक्रम कौतुकास्पद

नमन, जाखडी कलावंतांना जिवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रमात पो.नि.अनिल लाड यांचे प्रतिपाद

रत्नागिरी:- आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार, मित्र व पल्लवी फाऊंडेशनच्या विद्यमाने लोककलावंताना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोना काळात पत्रकारांनी महत्वाची भूमिका बाजवली आहे. पत्रकारिता करतानाच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी लोककलावंताना मदत करण्याचा केलेला प्रयत्न लोककलावंतांना प्रोत्साहन देणार ठरेल असे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी केले. सोमवारी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार, मित्र व पल्लवी फाऊंडेशनच्या विद्यमाने रत्नागिरीतील ३०० गरजू लोककलावंताना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतिश कामत, संदीप तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे, पत्रकार विजय पाडावे, राकेश गुडेकर, तन्मय दाते, गुरुप्रसाद सांवत, गणेश भिंगार्डे, सुरज आयरे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रतिष्ठानचे सचिव राजेश  कळंबटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वगत केले. त्यानंतर लोककलावंताना मदत करण्याच्या कार्यक्रमाचे स्वरुप उपस्थितांसमोर मांडले.कोकण म्हटलं की लोककला आलीच. येथेल लोककलावंत स्वत:ला झोकून दे त्यामध्ये काम करतात. शिमगोत्सव असो किंवा गणेशोत्सव यावेळी तर लोककलांना खरी रंगत येते. कोकण म्हटलं कि हापूस आंबा याच बरोबर कोकणची आणखीन एक ओळख म्हणजे कोकणची  लोककला.

नमन, जाखडी या कोकणच्या प्रमुख लोककला पहाण्यासाठी देशासह परदेशातील पर्यटक येथे येतात, मृदुंगाच्या तालावर डोलतात. अशी हि लोककला जपणारे येतील लोककलावंत आहेत. त्यांच्यामुळेच आज आपल्या कला जिवंत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे जगासह देशातील प्रत्येकजण अडचणीत आहे. आपले लोककलावंत  शेतकरी, शेती करुन कुटुंब चालवतात. त्यातूनच आपली लोककला जिंवत ठेवतात. आज आपण सर्वजण कोरोनामुळे अडचणीत आहात. यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्याला मदत करण्यासाठी मुंबईतील पत्रकार व मित्र, पल्लवी फाऊंडेशन पुढे आले. आज राज्यातील गरजू लोककलावंताना मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रत्नागिरीत आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची भेट आम्ही आपल्या पर्यंत पोहचवित असल्याचे राजेश कळंबटे यांनी सांगितले.

यावेळी  जाखडी, नमन मंडळाच्या प्रतिनिधींना प्रातिनिधीक स्वरुपात पो.नि. अनिल लाड यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी  सोमेश्वर नाट्य नमन मंडळ वांद्री, संगमेश्वरी बाज आदी मंडळाच्या प्रतिनिधींना साहित्याचे वाटप करण्यात आले.