लांजा:- येथे 7 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लांजा-तालुक्यातील कोर्ले गावी ही धक्कादायक घटना घडली. सात वर्षीय आर्या राजेश चव्हाण असे गळफास घेतलेल्या मुलीचे नाव आहे. राहत्या घरी भिंतीच्या खिळ्याला गळफास लावून आत्महत्या केली . याबाबत अधिक तपास लांजा पोलीस उप निरीक्षक तेजस्वनी पाटिल करीत आहेत.
मृत मुलीचे शव रत्नागिरी येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. चार दिवसाच्या अंतराने अल्पवयीन मुलीची दुसरी आत्महत्या त्यामुळे या घटनेने जिल्हा हादरला आहे अशीच घटना काही दिवसांपूर्वी च दापोली येथे एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली होती.