लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली तरी ग्रामस्थांनी यशस्वी केले आंदोलन
खेड:- गेले कित्येक दिवस वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील लक्ष्मी ऑर्गानिक हा कारखाना बंद झालाच पाहिजे अशा घोषणा देत हजारोंच्या संख्येने आज कोकणी जनतेने या कारखान्यावर मोर्चा काढला.
या कारखान्यांमध्ये घेण्यात येणारे अत्यंत घातक पीफास रसायन हे कोकणाच्या निसर्गास तसेच मानवी जीवनाचे घातक आहे. आणि म्हणूनच हे उत्पादन या कारखान्यात घेतले जात असेल तर हा कारखाना बंद झालाच पाहिजे अशी मागणी करत हजारो आंदोलकांनी मोर्चा काढला. यामध्ये कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, अखिल दाभोळ खाडी मच्छीमार संघटना त्याचप्रमाणे असंख्य सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या संघटना आणि पंचक्रोशीतील गावांमधून आलेले कोकणी बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. पी पास हटाव कोकण बचाव, बंद करा बंद करा लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा, नफा तुमच्या खिशात आणि आजारांच्या दारात, इत्यादी प्रकारच्या घोषणा या मोर्चातील सहभागी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.
हा कारखाना बंद व्हावा या मागणीसाठी गेले 76 दिवस कारखान्याच्या गेटवर धरणे आंदोलन सुरू आहे. अशोक जाधव आणि राजेंद्र गोपीनाथ आंब्रे हे गेल्या 76 दिवस हे आंदोलन करीत असून हळूहळू त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण जिल्हाभरातून नव्हे तर महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाच्या वेळी पोलीस प्रशासनाकडून चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून पाचशे मीटर अंतरावर मोर्चा थांबवण्याच्या सूचना या आंदोलन कर्त्यांना दिल्या गेल्या होत्या. तिथपर्यंत आल्यानंतर आंदोलनकर त्यांच्या वतीने उदय घात यांनी आंदोलना पाठीमागची पार्श्वभूमी आणि उद्देश प्रशासनाला सांगितला. धरणे आंदोलनात बसलेले अशोक जाधव यांनी हे आंदोलन कोणा एकट्याचे नसून सर्व कोकणी जनता शेतकरी आणि निसर्गासाठी आहे.
हा कारखाना बंद होण्यासाठी निलेश 76 दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. तरीही प्रशासनाने किंवा कारखान्या व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा महाराष्ट्र शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतले नाही. म्हणून आम्हाला हा मोर्चा काढून कोकणी जनतेची ताकद दाखवावी लागली. अजूनही सरकार आणि प्रशासन यांनी दखल घेतली नाही तर आमचे आंदोलन यापुढेही असेच किंबहुना याहूनही अधिक तीव्र करण्यात येईल असे सांगितले.









