रोटरीकडून रत्नागिरी शहरासाठी विद्युत शवदाहिनी देण्याचा निर्णय

रत्नागिरी:-रत्नागिरी शहराला गरज असलेली विद्युत शवदाहिनी लवकरच मिळणार आहे. रोटरी क्लबने शवदाहिनी देण्याची तयारी दर्शविली असून तसा ठराव नुकताच बैठकीत मंजूर करण्यात आला. तो जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच याबाबत निर्णय होणार आहे. 

रत्नागिरी शहरासाठी प्रमुख दोन स्मशानभूमी आहेत. मिरकरवाडा आणि चर्मालयातीलातील स्मशानभूमिचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी एका स्मशानभूमीत लवकरच विद्युत शवदाहिनी बसवली जाणार आहे. त्याचबरोबर चर्मालय येथील स्मशानभूमीत कोरोना बाधिताच्या मृत्यूनंतर त्या रुग्णांला दहन करण्यासाठी स्वतंत्र चीता रचण्यासाठी लोखंडी स्टँड तयार केले आहे. पावसाळ्यात सरणावर रचण्यासाठी लागणारी लाकडे ओली असतात. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी विद्युत शवदाहिनीची गरज भासते. अनेक दिवसांपासून शवदाहिनी बसविण्याबाबत मतमतांतर आहे. काहींच्या भावनांचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र आता ती गरज बनल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे रोटरी क्लबने शवदाहिनी देण्याची तयारी दर्शवली आहे. ही शवदाहिनी स्मशानभूमीत बसवण्याबाबतचा नुकताच ठराव मंजूर झाला. आता जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी तो पाठवला जाणार आहे.

कोरोनाबाधित मृत रुग्णांवर चर्मालय येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाची भीती निर्माण झाली असल्याने अशा मृत रुग्णांसाठी स्वतंत्र चीता रचण्यासाठी मागणी होत होती. ती चर्मालयात पालिकेने स्वतंत्र लोखंडी स्टॅड उभा  केला आहे. आता शवदाहिनीचा ठराव लवकरच मंजूर होऊन ती कुठे बसवायचा हा निर्णय घेतला जाणार आहे.