रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन अध्यक्षपदी प्रसाद खेडेकर 

रत्नागिरी:- रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. अध्यक्षपदी रत्नागिरीतील प्रसिद्ध सुवर्णकार प्रसाद खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे क्लबचा पदग्रहण सोहळा व्हर्चुअल पद्धतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. 
 

1 जुलै 2020 पासून रोटरी इंटरनॅशनल वर्ष सुरु झाले. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्षपद सन २०२०-२१ करिता जर्मनीचे रोटेरिअन व्हॉल्गर क्नॅक यांच्याकडे आहे. या अंतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून कोल्हापूरचे उद्योजक रोटेरीअन संग्राम पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. तर कोकण विभागाकरिता असिस्टंट गव्हर्नर म्हणून रोटेरीअन समीर इंदुलकर काम पहात आहेत. 

रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन ही संस्था समाज उपयोगी कामांसह शिक्षण, आरोग्य, माता बाल संगोपन, पाणी व्यवस्थापन अशा विविध स्तरांवर रत्नागिरी परीसरामध्ये कार्यरत आहे. संस्थेचे सेक्रेटरी म्हणून म्हणून अ‍ॅड. विनय आंबूलकर हे कार्यरत आहेत. तसेच खजिनदार म्हणून म्हणून रोटे हिरकांत साळवी या रोटरी वर्षाकरीता काम पाहणार आहेत. या क्लबचे पदाधिकारी म्हणून क्लब सर्व्हिस संचालक रोटे गणेश जोशी, कम्युनिटी सर्व्हिस संचालक रोटे बिपीनचंद्र गांधी, व्होकेशनल सर्व्हिस संचालक रोटे केदार माणगांवकर, इंटरनॅशनल सर्व्हिस संचालक रोटे जयंतीलाल जैन, युथ सर्व्हिस संचालक रोटे जयेश दिवाणी तर पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून रोटे सौरभ मलूष्टे व रोटे दिगंबरजी मगदूम आणि वेबमास्टर म्हणून रोटे संजय पतंगे यांची या रोटरी वर्षाकारीता निवड करण्यात आली आहे. २५ जुलै रोजी आयोजित या पदग्रहण सोहळ्याला पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथचे सदस्य, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेशजी उर्फ बबन देशपांडे यांनी काम पाहिले. 

  रोटरी इंटरनॅशनलने नेमून दिलेल्या आदर्श निर्देशानुरुप, विविध स्तरांवर सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले असून सर्व रत्नागिरीकरांची या सामाजिक उपक्रमात क्लबला साथ मिळेल असा विश्वास नूतन अध्यक्ष प्रसाद खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.क्लबच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच वृक्ष लागवडीने आपल्या कामाची सुरुवात केली. प्रत्येक सदस्याने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संगोपन करावे अशी संकल्पना यावेळी निश्चित करण्यात आली.