रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव ते रेल्वेस्टेशनकडे जाणार्या फाट्याजवळ दुचाकीची पादचार्याला धडक बसून अपघात झाला.अपघाताची ही घटना गुरुवार 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10.45 वा.घडली.
समीर बाबासो मोकाशी (31,रा.मिरजोळे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे.तर या अपघातात प्रविण चंद्रकांत कदम (45,रा.मिरजोळे,रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.गुरुवारी रात्री समीर मोकाशी आपल्या ताब्यातील बुलेट दुचाकी (एमएच-08-एए-0564) घेउन भरधाव वेगाने कोकणनगर ते मिरजोळे अशी घेउन जात होता.तो मिरजोळे येथील कंचन हॉटेलचे पुढे कुवारबाव रेल्वेस्टेशनकडे जाणार्या फाट्याजवळ आला असता पादचारी प्रविण कदम यांना पाठीमागून धडक देत त्याने अपघात केला.या अपघातात दोघांनाही दुखापत झाली असून अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.