रिळच्या सरपंच पदावर राकेश महाडिक बिनविरोध

रत्नागिरी:- तालुक्यातील रिळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदावर राकेश महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच मिलिंद वैद्य यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते.

सोमवार ११ मार्च रोजी रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लावण्यात आली होती. सरपंच पदासाठी सहा सदस्यांपैकी केवळ राकेश महाडिक यांचा एकमेव अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाला. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यांनी राकेश महाडिक यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. राकेश महाडिक हे संपूर्ण गावात मिळूनमिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. सरपंच पदावर निवड होताच त्यांनी मिलिंद वैद्य यांची अपूर्ण कामे पूर्णत्वास नेणार असल्याचे सांगितले. सरपंच झाल्यानंतर मिलिंद वैद्य यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतीमेचे दर्शन घेऊन वैद्य यांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेत आपले कार्य सुरू करीत आहोत असे सांगितले.

सामान्य कुटुंबातील साधे राहणीमान असलेल्या घरातील सदस्य राकेश महाडिक सरपंच झाल्यानंतर पूर्ण परिसरातून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपा उत्तर तालुका अध्यक्ष श्री. विवेक सुर्वे, वरवडे माजी सरपंच श्री. निखिल बोरकर, उद्योजक श्री मनोज विचारे , विकास चव्हाण, प्रशांत पारकर, विनायक महाडिक , अक्षय महाडिक , विवेक गुरव , आदेश सागवेकर , संकेत चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेटून नवनिर्वाचित सरपंच राकेश महाडिक यांना शुभेच्छा दिल्या.