Wednesday, May 27, 2026
spot_img
Home राजापूर रिक्षासमोर अचानक बैल आल्याने रिक्षा उलटली; दोन जण जखमी

रिक्षासमोर अचानक बैल आल्याने रिक्षा उलटली; दोन जण जखमी

रत्नागिरी:- भरधाव रिक्षासमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाला. अपघाताची ही घटना गुरुवार 19 मार्च रोजी रात्री 8 वा.सुमारास चौके-राजापूर ते डोंगर जाणाऱ्या रस्त्यावरील दत्तवाडी स्टॉप जवळ घडली.

रिक्षा चालक सुभाष काशिनाथ शिरवाडकर (40) आणि प्रवासी डॉ.सुभाष डाग अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. गुरुवारी रात्री रिक्षा चालक सुभाष शिरवाडकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एक्यू-0510) मधून डॉ.सुभाष डाग यांना घेउन चौके राजापूर ते डोंगर असे जात होते. त्यांची रिक्षा दत्तवाडी स्टॉपजवळ आली असता अचानकपणे त्यांच्या रिक्षेसमोर एक बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून हा अपघात झाला. जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.