रत्नागिरी:-जिल्ह्यात वर्षभरात तळीरामांनी थोडी थोडकी नव्हे, तर ७७.४६ लाख बल्क लिटर दारू रिचवली आहे. मद्यप्रेमींच्या देशी, विदेशी आणि बिअर मिळून ही मद्याची विक्री झाली आहे. यामध्ये बिअर विक्रीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. एवढेच नव्हे, तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये दिलेले महसुलाचे ६ कोटीचे उद्दीष्टही या विभागाने पुर्ण केले आहे. वर्षभरात १ हजार ३१९ जणांवर गुन्हे दाखल करून ८१८ आरोपींना अटक केली. त्याच्याकडुन ४ कोटी ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धोमकर यांनी दिली.
कोरोना महामारीच्या संकटाचा काही कालावधी सोडला तर राज्य उत्पादन शुल्क विभाग महसुलात काही कमी पडलेला नाही. महामारीमध्ये तब्बल मद्य विक्री बंद होती. दारूची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर रांग लावली होती. सोशल डिस्टन्स पाळत आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करत अनेकांनी दारू खरेदी केली. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देणार्या विभागापैकी हा एक विभाग आहे. एक दोन लाख नाही तर लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दीड कोटीचा कमी महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या विभागाकडूनच देशी दुकाने, बिअरशॉपी, वाईन मार्ट आदीला परवाने देऊन त्याचे नुतनीकरणही केल जाते. त्यांचा परवाना आणि करापोटी राज्य उत्पादन शुल्क विभागाला हा महसूल मिळतो. जिल्ह्यातील देशी दुकानांमध्ये २०२१-२२ ला १७.६८ लाख बल्क लिटर मद्याची विक्री झाली, विदेशी मद्याची विक्री ला २४.६२ लाख बल्क लिटर तर बिअरची विक्री ३५.१६ लाख बल्क लिटर एवढी झाली आहे. वर्षभरात मद्यप्रेमिंनी ७७.४६ लाख बल्क लिटर दारू रिचवली आहे. त्यामुळे मनसोक्त दारू रिचवण्याच्यादृष्टीने मद्याची प्रचंड खरेदी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या आर्थिक वर्षीच्या तुलनेत २०२०-२१ ला मद्याची झालेल विक्री जास्त आहे. यावर्षी देशीदारू २२.७५ लाख बल्क लिटर विक्री झाली, विदेशी २४.३१ लाख बल्क लिटर तर बिअर ३९.०६ लाख बल्क लिटरची विक्री झाली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२०-२१ मध्ये १ हजार ४२५ जणांवर गुन्हा दाखल करून ७८० आरोपींनी अटक केली होती. यामध्ये २ कोटी ३० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर २०२१-२२ मध्ये १ हजार ३१९ गन्हे दाखल करून ८१८ आरोपींना अटक केली. या कारवाईमध्ये ४ कोटी ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शासनाने या खात्याला गेल्या वर्षी ६ कोटी महसुलाचे उद्दीष्ट दिले होते. या विभागाने उद्दीष्टापेक्षा जास्त महसुल शासनाला मिळुन दिल्याचे श्री. धोमकर यांनी सांगितले.