राजापूर जांभवली येथून तरुण बेपत्ता

राजापूर:- राजापूर तालुक्यातील जांभवली नारकरवाडी येथील ग्रामस्थ योगेश प्रकाश तळेकर (वय ३०) हे १२ जुलै रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून सायंकाळी ५ वा. सुमारास निघून गेलेले आहेत. राजापूर पोलिस स्थानकांत याची खबर योगेश तळेकर यांच्या पत्नी योगिनी प्रकाश तळेकर यांनी दिली आहे.

नारकर हे घरातून निघून गेल्यावर त्यांचा सर्व नातेवाईक व पररिसरातील गावांमधून शोध घेण्यात आला. मात्र, सापडून आले नाहीत. सफेद रंगाचा टी शर्ट व काळी पैंट परिधान केलेली आहे. याबाबत आर. एच. मुजावर करीत असून कुठे सापडल्यास त्वरित राजापूर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन – राजापूर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.