Friday, October 30, 2026
spot_img
Home सामाजिक राजापुरात सापडले 400 वर्षांपूर्वीचे दस्तऐवज

राजापुरात सापडले 400 वर्षांपूर्वीचे दस्तऐवज

मोडीपत्रातून उलघडणार स्थानिक इतिहास

राजापूर:- दीपक शेलार यांच्या डोंगर येथील घरामध्ये जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीमध्ये सुमारे १० ते १२ जुनी मोडीलिपीतील पत्रे आढळून आली आहेत. त्यापैकी राजापूर परिसरातील नाईक सरदेसाई घराण्याशी संबंधित जुन्या कागदपत्रांतून इ. स. १६६८ ते १७६५-६६ या जवळपास शतकभराच्या कालखंडातील स्थानिक इतिहासाचे महत्त्वपूर्ण संदर्भ समोर येत आहेत.

या दस्तऐवजांमध्ये जमीनवाटप, बागायतीसंबंधीचा कौलनामा, वतन हक्कांवरील वाद, छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील आज्ञापत्र, रामचंद्रपंत अमात्य यांच्या नावाने असलेला पत्रव्यवहार आणि दत्तक विधानाद्वारे वतनाचा वारस निश्चित करण्याच्या प्रक्रियेपर्यंतच्या नोंदींचा समावेश आहे.

इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना हे दस्तऐवज अभ्यासासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी एका कागदपत्राचे नाशिक येथील शासनमान्य मोडीलिपी वाचक रामनाथ रावळ यांनी वाचन केले. कोकणातील राजापूर, प्रभावळी, दाभोळ, संगमेश्वर, विजयदुर्ग आणि डोंगर या परिसरांशी संबंधित उल्लेखही आढळून आले आहेत.

या कागदपत्रांतील सर्वांत जुन्या नोंदींपैकी एकावर इ.स. १६६८ हे वर्ष नमूद आहे. या नोंदीत नरसोवा नाईक सरदेसाई यांना जमीन देण्यासंबंधीच्या कौलनाम्याचा उल्लेख असून, त्यातील महसूल संबंधित अटींचे संदर्भ या नोंदीतून त्या काळातील जमीनवाटप, बागायतीचा विकास आणि महसूल परस्परसंबंध स्पष्ट होतो.

व्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा उलगडा होण्यास मदत होणार आहे. इ.स. १६९४ वर्षाच्या नोंदीवरून छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञापत्रातील वतनविषयक संदर्भ अधोरेखित होत असून, त्याद्वारे त्या काळातील स्थानिक वतन व्यवस्था आणि राजसत्तेचा हस्तक्षेप अभ्यासासाठी उपयुक्त ठरतो. इ. स. १७१० च्या नोंदीवरून त्या काळामध्ये वतन हक्कांवरून निर्माण झालेला वाद, तर इ. स. १७१०च्या नोंदीतून वतन हक्कांशी संबंधित पत्रव्यवहारातून स्थानिक वतनदारांचे अधिकार आणि त्यांच्याशी संबंधित प्रशासकीय जबाबदाऱ्या यांचा

इ. स. १७६५-६६ च्या नोंदींमध्ये नरसोवा नाईक सरदेसाई यांना पुत्रसंतान नसल्याने त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांनी रामाजी नाईक यांना दत्तक घेतल्याचा उल्लेख आढळून येतो. त्याच्यातून नाईक सरदेसाई घराण्याच्या इतिहासातील विविध टप्पे समोर येताना जमीनवाटप व बागायती विकास, वतनाचे अधिकार, वारसाहक्कावरील वाद, राजसत्तेकडे मागितलेली दाद आणि दत्तकविधानाद्वारे वतनाचे सातत्य राखण्याची प्रक्रिया अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्यास मदत होत आहे.

दुर्लक्षित पैलू स्पष्ट होऊ शकतात

या कागदपत्रांतील व्यक्तींची नावे, गावांची नावे, पदनामे, दिनांक आणि प्रशासकीय संज्ञा यांची मूळ दस्तऐवजांशी पडताळणी करून कालानुक्रमिक मांडणी केल्यास राजापूरच्या इतिहासातील अनेक दुर्लक्षित पैलू स्पष्ट होऊ शकणार असल्याचे इतिहास अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.