राज ठाकरे ८ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

खेड:- मनसे प्रमुख राज ठाकरे ८ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत . या दौऱ्यामध्ये राज ठाकरे हे चिपळूण येथे भेट देणार असून जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून जिल्हा बैठक घेणार आहेत , अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली.

या बैठकीत काही महत्त्वाचे आदेशही देण्यात येणार असल्याने या दौऱ्याकडे लक्ष लागले असून या संदर्भातील ठोस आराखडा लवकरच जाहीर केला जाणार आहे . यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . ७ जुलै रोजी संध्याकाळी राज ठाकरे यांचे चिपळूण येथे आगमन होणार आहे . त्यानंतर ८ रोजी सकाळी ११ वाजता अतिथी सभागृह येथे बैठक होईल त्यानंतर दुपारचे भोजन घेऊन राज ठाकरे हे खेडमार्गे दापोलीकडे प्रयाण करतील खेड येथे त्यांचे जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती खेडेकर यांनी दिली . त्यानंतर दापोली येथे नवीन शाखा कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होईल व नंतर राज ठाकरे मुंबईकडे प्रयाण करतील . या दौऱ्याची संपूर्ण तयारी सरचिटणीस वैभव खेडेकर , जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण , जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर , जिल्हा सचिव संतोष नलावडे , उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि संपर्क अध्यक्ष करीत आहेत.